Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबईतील अ.नगर शहर जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक पुढे ढकलली

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर :- शहर जिल्हा काँग्रेसची पुढील आठवड्यात १८ मार्च रोजी मुंबईत होणारी संघटनात्मक आढावा बैठक काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी लेखी पत्राद्वारे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना कळविले आहे. 

 याबाबत माहिती देताना किरण काळे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी पुढील आठवड्यात होणारी नियोजित बैठक नवीन सुधारित तारखेला घेण्यात येणार असून सदर तारीख लवकरच आपल्याला कळविण्यात येईल असे कळविले आहे.  महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ. लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुधारित तारखेला ही बैठक आता पार पडेल. 

 कोरोना संकट काळामध्ये लॉकडाउन असल्यामुळे पक्षाच्या आढावा बैठका या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांनी ऑनलाइन घेतल्या होत्या. संगमनेर येथे देखील ना. बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची आढावा बैठक घेतली होती. 

 तसेच आ.डॉ. सुधीर तांबे यांनी देखील अनेक वेळा शहर जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक घेतली आहे. आ. नाना पटोले हे नवीन प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित केली असून त्यामध्ये नगर शहर जिल्हा काँग्रेसचा देखील आढावा घेतला जाणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या