Ticker

6/Breaking/ticker-posts

४ पिस्टल व ६ जीवंत काडतुस पोलीसांनी केले जप्त; दोन तरुणांना अटक

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

जामखेड :- शहर व तालुक्यात अनेक वेळा बेकायदेशीर रिव्हॉल्वर व गावठी कट्ट्यांचा वापर करून अनेक गुन्हे , तसेच खुन केल्याच्या घटनाही घडल्या आहेत त्यातच पुन्हा ४ पिस्टल पोलीसांनी जप्त केल्या आहेत  त्यामुळे जामखेड तालुक्याचे  पिस्टल चे  भय संपता संपेना असेच दिसत आहे.४  पिस्टल व सहा जीवंत काडतुस पोलिसांनी जप्त केल्याने पिस्टल चे मोठे रॅकेट उघड होणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शहरातील दोन तरुणांनी विक्रीसाठी आणलेली एक लाख रुपये किंमतीचे चार पिस्टल व सहा जीवंत काडतुसे पोलीसांनी जप्त करत दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. 

याबाबत जामखेड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की , शुक्रवारी दि . १२ रोजी रात्री दहाच्या सुमारास जामखेड शहरात राहणारे ऋषी उर्फ ( पप्पू ) मोहन जाधव , वय २२ वर्षे राहणार जामखेड व दीपक अशोक चव्हाण , वय ३२ वर्षे रा . तपनेश्वर गल्ली , जामखेड हे दोन तरूण पिस्टल विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सहका - यांसह आरोपींच्या घरी छापा टाकून त्या दोघांना ताब्यात घेतले . त्यांच्याकडे चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे आढळून आले .

 ऋषी उर्फ ( पप्पू ) मोहन जाधव हा विनापरवाना बेकायदा मनाई केलेले ७.६२ एम एम ची २५ हजार दोनशे रुपये किमतीचे एक अग्निशस्त्र पिस्टल व २ जिवंत काडतुसे असे स्वतःहा जवळ बाळगताना मिळून आला आहे . तर दुसरा आरोपी दीपक अशोक चव्हाण हा मनाई केलेले ७० हजार ४०० रुपये किमतीचे एकूण ३ पिस्टल व ४ जीवंत काडतुसे अशी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या जवळ बाळगताना मिळून आला आहे . आता याचे मोठे रॉकेट तर नाही ना याचा तपास पोलीस करीत आहेत .

 अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात ,सहायक फौजदार परमेश्वर गायकवाड ,पोहेकॉ.संजय लाटे ,पोकॉ आबासाहेब आवारे ,पोकॉ संग्राम जाधव, पोकॉ.अविनाश ढेरे ,पोकॉ.विजयकुमार कोळी ,पोकॉ.अरूण पवार, पोकॉ.संदिप राऊत ,पोकॉ.संदिप आजबे ,पोकॉ.सचिन देवढे ,पोकॉ.सचिन पिरगळ यांनी ही कामगिरी केली आहे.

 याप्रकरणी पो.कॉ आबासाहेब आत्माराम आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोन्ही आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे . पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर . व्ही . थोरात करत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या