Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डी तालुक्यात तीन ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 पाथर्डी :- पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी,कोल्हार आणि पाथर्डी शहरातील नाथनगर हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून या क्षेत्रातील अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार तथा इंसिडेंट कमांडर शाम वाडकर जारी केले आहे. 

वाढता कोरोना रुग्णांचा आकडा पाहता आता तालुका प्रशासनाने पूर्वी प्रमाणे कोरोनाचे निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. शिरसाटवाडी गावात चौदा ,कोल्हार येथे सतरा,तर नाथनगर या भागात सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने हि कारवाई करण्यात आली आहे.

हळूहळू पूर्वीप्रमाणे कोरोना बाबत एक एक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.२३ ते २९ मार्च पर्यंत शिरसाटवाडी व नाथनगर . तर कोल्हार हे १९ ते २५ मार्च पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे.झपाट्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून निर्बंध आणले आहेत.    

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या