Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना इफेक्ट ! आजपासून रात्री ८ नंतर ‘ह्या’ सर्व गोष्टींना ‘बंदी’; जाणून घ्या नवीन गाईडलाईन

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : -महाराष्ट्रात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जी आकडेवारी समोर येत आहे ती खूपच चिंताजनक आहे. विविध शहरांमध्ये रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या समोर येत आहे. हे सर्व लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात रात्रीसाठी जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. आता राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात नव्याने गाइडलाइन जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

  • ‘ह्या’ आहेत नव्या गाईडलाईन
  • आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील.
  • आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. हे नियम न पाळल्यास प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
  • मास्क बंधनकारक असणार आहे. मास्क न घालता जर कोणी फिरले तर व्यक्तीला 500 रुपये दंड आकारण्यात येईल .
  • सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचं बंधन असणार आहे. जे नियम घालून दिले आहेत ते न पाळल्यास हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
  • सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना कोणतीही परवानगी राहणार नाही. नाट्यगृहे आणि हॉल अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरता येणार नाहीत. अशा प्रकारे कुणी कार्यक्रम केल्यास कारवाई करमअयात आली. तसेच संबंधित नाट्यगृह किंवा हॉलची मालमत्ता कोरोना काळ संपेपर्यंत बंद ठेवण्यात येील.
  • लग्नकार्यात ५० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.
  • अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी असेल.
  • धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दर तासाला कमाल किती भाविक असावेत ते निश्चित करावे. त्या ठिकाणी वावरण्यास पुरेशी जागा व आरोग्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाहीत ते सुनिश्चित करावे. ऑनलाईन आरक्षणावर भर द्यावा
  • सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. काही बंधनांसह हे सर्व सुरू राहिल. नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंडाची तरतूद केली आहे.
  • कोविड रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर १४ दिवसांसाठी तसा सुचना फलक लावण्यात येईल.
  • शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तत्काळ कामांसाठीच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या