लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
वाळकी : मोबाईल हा काळाची गरज असला तरी तरुणांनी खेळाकडे दुर्लक्ष करू नये . मुलांनी शिक्षणा सोबत खेळात देखील आपलं भवितव्य घडवलं पाहिजे.खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते . त्याचबरोबर खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. असे प्रतिपादन माजी जि.परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केले .
गुंडेगाव ( ता. नगर ) येथे भरविण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धचा शुभारंभ बाळासाहेब हराळ यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी ते बोलत होते . क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो.खेळ जीवनात खूप आवश्यक आहे. आयुष्यभर एखादा खेळ छंद म्हणून खेळत राहिलात तर नक्कीच एक आरोग्यपूर्ण जीवन तुम्ही जगू शकता. त्यामुळे खेळाचे महत्त्व लहानपणीच कळाले तर मुले खेळात पारंगत तर होतीलच शिवाय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनतील.आज कालच्या युगातील मुले ही मैदानी खेळ कमी तर ह्या आधुनिक जगात मोबाईल सारख्या तंत्रज्ञानामुळे भरकटत चालली आहे खेळ कोणताही असो तो जिंकण्यासाठी आपल्या बुदधीचा वापर करतो व मनात एक जीद्द ठेवुन जिज्ञासा वृत्तीने लक्ष केंद्रित करुन तो खेळ एकाग्रतेने खेळुन त्यात हमखास यश हे प्राप्त केले जाते. असे खेळाडूंना मार्गदर्शन करताना हराळ यांनी सांगितले
यावेळी जेष्ठ नागरिक वामनराव जाधव , मा . सरपंच व विद्यमान सदस्य संजय कोतकर , सुनील भापकर, उद्योजक किरण कोतकर, चंद्रकांत निकम, दादासाहेब आगळे, संदीप भापकर, उद्योजक अरुण येठेकर, पुणे पोलिस बाळासाहेब हराळ, शिंदे युवराज, राजेंद्र मोहिते,मेजर संदिप कोतकर, तसेच क्रिकेट स्पर्धा नियोजन समिती संतोष जरे, गणेश कोतकर,स्वप्निल कपिले,सचिन जरे,भैया हराळ, पवण जरे, यश सतिश चौधरी, ऋषिकेश शिंदे, स्वप्नील भापकर यांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
0 टिप्पण्या