वामनभाऊ नगर मधील बंद पथदिवे झाले चालू
लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
पाथर्डी : पाथर्डी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व ऊद्घाटनापासुन बंद असलेले सी सी टी व्ही व वामनभाऊ नगर मधील बंद पथदिवे मनसेच्या घेराव आंदोोलनामुळे अखेर चालु करण्यात आले असून. मनसेच्या आंदोलनाला यश आले आहे
याबाबत माहिती अशी , शहरातील वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण अाटोक्यात राहण्याच्या उदात्त हेतुने बसविण्यात अालेले सी सी टी व्ही (CCTV) हे उद्घाटनानंतरच्या गेले ५ बंद पडलेले होते CCTV ची स्टंटबाजी करत ऊद्घाटनाची घाई करुन व सर्व सामान्यांच्या खिशातून लाखो रुपयांचा केलेला खर्च कशासाठी करण्यात आला.?असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना घेरावो घालत अांदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना संतोष जिरेसाळ यांनी सांगितले की पाथर्डी शहरातील सर्व नागरिक, महिला व मुलींच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून बसविण्यात आलेले त्याच बरोबर शहरातील गुंडगिरी, मारामारी, बसस्थानकावरील नित्यनियमाने होत असलेली पाकीटमारी या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी महत्वाचे असणारे व नगरपरिषदेच्या वतीने मोठा गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आलेले शहरातील CCTV उद्घाटना नंतरच्या महिनाभरापासून ते आजपर्यंत बंद अवस्थेत आहेत,यामुळे शहरात महिला व मुलींची छेडछाड, पाकीटमारी चे प्रमाण प्रचंड वाढले असुन शहरात व उपनगरी भागात चोरांनी उच्छाद मांडला आहे. CCTV बंद असल्यामुळे यातील गुन्हेगारांना ओळखणे पोलिसांना देखील अशक्य झाले आहे. नगरपरिषदेला CCTV चालु ठेवायचे नसतील तर नागरिकांच्या खिशातून लाखो रुपयांचा चुराडा का करण्यात आला? कि ही फक्त नगरपरिषदेचे निधी खर्च करण्यासाठीची स्टंट बाजी होती? असा प्रश्न समस्त पाथर्डी करांना पडलेला आहे. त्याच बरोबर मागील सुमारे एक महिन्यापासून वामनभाऊनगरमधील पोस्ट ऑफिस चा परिसर ते शिवाजीराव गर्जे साहेब यांचे घर ते माउली बेळगे यांचे घर व पानखडे मळा या परिसरासह अनेक भागातील पथदिवे ( स्ट्रीट लाईट) बंद अवस्थेत आहेत यामुळे परिसरात संध्याकाळी अंधाराचे साम्राज्य पसरत असून नुकतेच येथील रहिवासी . रमेश लोखंडे यांच्या घरी जबरी चोरी चा प्रकार घडला आहे यामुळे या भागातील नागरिक भयग्रस्त झालेले असल्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निदर्शनास आणून दिले होते .
शहरातील सर्व नागरिक, महिला,शाळकरी मुली,खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या हितासाठी बसवलेले व सध्या शोभेचे बाहुले बनलेले CCTV त्वरित कार्यान्वित करून वामनभाऊनगर मधील स्ट्रीट लाईट तातडीने सुरु कराव्यात अन्यथा आपल्या कार्यालयात सर्व नागरिकांसह यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल व शहरात यापुढे घडणाऱ्या सर्व चोरी-लुटमार व छेडछाडीस मुख्याधिकार्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देण्यात आला. होता .अांदोलकांचा रोष पाहुन मुख्याधिकारी श्री धनंजय कोळेकर व बाधकाम अभियंता श्री संजय गिरमे यांनी जिरेसाळ व CCTV बसवनारे ठेकेदार रितेश खेरा यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा घडवून अाणत शहरातील बंद असलेले CCTV लगेच सुरू करण्यात येतील व ते कायमस्वरूपी सुस्थितीत सुरू राहतील व वामनभाऊ नगर मधील बंद पडलेले स्ट्रीट लाईटचे काम तत्काळ हाती घेऊन ते सुरू करण्यात येतील असे अाश्वासन लेखी स्वरूपात दिले होते त्यानुसार कार्यवाही झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून मनसेला धन्यवाद दिले .
या आंदोलनात मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण शिरसाट,शहर सचिव संदिप काकडे,शहर उपाध्यक्ष सोमनाथ फासे,शैलेश शिंदे, राजु गिरी,विभागध्यक्ष गणेश कराडकर,परिवहन सेनेचे तालुकाध्यक्ष माऊली बेळगे,प्रथमेश नाकील पांडुरंग धायतडक यांचेसह नगरपरिषदेचे अभियंता संजय गिरमे,कार्यालयीन अधिक्षक अय्युब सय्यद,सोमनाथ गर्जे,स्वच्छता निरीक्षक दत्ता ढवळे अादी सहभगी झाले होते.
0 टिप्पण्या