Ticker

6/Breaking/ticker-posts

घोडेगावची सुरक्षा यंत्रणाच ‘रामभरोसे’

 


लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 सोनई:- घोडेगाव (ता नेवासा) येथे ग्रामपंचायतीने पोलीस चौकी साठी मोफत कार्यालय जागा देऊन सुद्धा त्या कार्यालयात पोलीस कर्मचारी उपस्थित नसतात ग्रामस्थ व लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसवण्यात आले परंतु कित्येक कॅमेरे बंद आहेत पोलिस चौकीत बसविण्यात आलेला डी व्ही आर मशीनही गायब झालेले आहे या व अशा अनेक तक्रारी घोडेगावचे सरपंच राजेंद्र देसरडा, सीसीटीव्ही दक्षता समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले असून केवळ स्थानिक पोलिसांचे दुर्लक्षामुळे घोडेगावची 'सुरक्षा रामभरोसे’ असल्याचे निवेदन वरिष्ठांना देण्यात आलेले असून त्याची प्रत वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी देण्यात आलेली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की दीड वर्षापूर्वी येथे लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसविले होते गावात येणारे प्रमुख रस्ते, नगर औरंगाबाद महामार्ग व संवेदन  ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले होते जेणेकरून घोडेगाव ग्रामपंचायत प्रशासन व सोनई पोलिसांना गावातील घडामोडी थेट पाहता येऊन अनुचित प्रकारांना आळा बसेल परंतु सद्यस्थितीत ही यंत्रणाच बंद पडून कुचकामी ठरली आहे घोडेगावात बसविलेले ८ ते १० सीसी टीव्ही कॅमेरे मेंटेनन्स न केल्यामुळे काही दिवसातच बंद पडले तसेच या व इतर कॅमेऱ्यांचे चित्रीकरण सेव्ह करणारे डीव्हीआर मशीनही घोडेगावातील पोलीस चौकीतून गायब झालेले असताना पोलिस यंत्रणेचे सफशेल दुर्लक्ष होत असल्याचा लेखी आरोप ग्रामपंचायत व दक्षता समितीने या लेखी निवेदनातून केलेला आहे कॅमेर्‍यांचे बंद पडलेबाबत यापूर्वीही अनेक वेळा सोनई पोलिसांना तोंडी कळविण्यात आले.

 कॅमेरे कंत्राटदारानेही दुरुस्ती कामात दुर्लक्ष केले तसेच मराठी शाळेसमोर उड्डाणपुलाजवळ असलेले दोन कॅमेरे चोरीला गेलेले आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे की गेल्या काही दिवसापासून घोडेगावात चोरट्यांचा सुळसुळाट आहे भरवस्त्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच ठिकाणी घरफोड्या, धाडसी चोर्‍या झाल्या, घरातून सोन्याचे दागिने गेले, दुसऱ्या घटनेत घरासमोरून दुचाकी मोटरसायकल तर तिसऱ्या घटनेत रोकड रक्कम चोरली गेली, रस्त्यावरची पानटपरी फुटली गेली तर एका होमगार्डचे घरात चोरी झाली या व अनेक चोरयांचा तपास लागलेला नाही व एवढे होऊनही सीसीटीव्ही बंद असल्याने ग्रामस्थ चोरट्यांच्या दहशतीखाली आहेत आधीच मनुष्यबळ कमी तरी घोडेगावचे सुरक्षेची जबाबदारी सोनई पोलिसांवर आहे पोलीस चौकी असून तेथे चोवीस तास पोलिस कर्मचारी नसतो त्यामुळे गावकर्‍यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे निवेदनात म्हटले असून कॅमेरे यंत्रणा पूर्ववत सुरु व्हावी व गावात झालेल्या चोरीच्या घटनांचा तपास लावावा अशी मागणी सीसीटीव्ही दक्षता समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या