Ticker

6/Breaking/ticker-posts

सिनेक्षेत्रात राजकारणाचा तमाशा ; मराठी सिनेमा क्षेत्रात खळबळ..!

 

    

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 कोल्हापूर:-अखिल भारतीय चित्रपट महामंडळ मध्ये पुन्हा एकदा राजकारणाचा नवा तमाशा सुरू झाला आहे. विनापरवाना व अनावश्यक खर्च केलेली रक्कम न भरल्याने दोन विद्यमान संचालकासह बारा माजी संचालकांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय चित्रपट महामंडळाने घेतला आहे. यामुळे सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान सभासदत्व रद्द झालेल्या मध्ये विद्यमान संचालक सतीश रणदिवे, सतीश बिडकर यांच्यासह माजी संचालक विजय पाटकर, अलका कुबल, प्रताप सुर्वे, मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, बाळू बारामते, सदा सूर्यवंशी, विजय कोंडके, प्रिया बेर्डे , संजीव नाईक, अनिल निकम व सुभाष भुरके यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी दोन हजार दहा ते पंधरा या सालात तत्कालीन संचालक मंडळाने अनेक गोष्टीवर अनावश्यक खर्च केला होता. परवानगी न घेता केलेला खर्च , घेतलेले मानधन या संचालकांनी महामंडळात भरावे असा आदेश धर्मादाय आयुक्त व न्यायालयाने दिला होता. दहा लाखापेक्षा अधिक असलेली ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने या संचालकांवर कारवाई करण्यात आली आहे .
ही रक्कम भरण्याची मुदत तीन फेब्रुवारीपर्यंत होती . तरीही या आजी व माजी संचालकांनी ती न भरल्याने अखेर शुक्रवारी या सर्वांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा नोटिसा सर्वांना पाठविण्यात आल्या .यामुळे सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गेल्या सहा महिन्यात महामंडळात सतत राजकारण सुरू आहे. विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांचे पद घालण्यात आले होते. त्यानंतर मेघराज भोसले यांनी प्रतिडाव खेळत आपले पद वाचवले. आता तर त्यांनी या डावात असणाऱ्या अनेकांचे संचालक सभासदच सभासदत्व रद्द केल्याने महामंडळातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान…

संचालकांना न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही त्यांनी रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
-मेघराज भोसले, अध्यक्ष चित्रपट महामंडळ

महामंडळाने केलेली ही कारवाई आकसातून केली असून ती बेकायदेशीर आहे. या कारवाईविरोधात आपण धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागणार आहोत .
-मिलिंद अष्टेकर ,माजी संचालक चित्रपट महामंडळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या