Ticker

6/Breaking/ticker-posts

"अण्णांच वय झालंय, त्यांनी आता निवृत्ती घ्यावी", कोण म्हणाले

 

शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांचा अण्णा हजारेंना सल्ला

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 सांगली : एकदा का पैलवानाने हिंदकेसरी पद मिळवलं की त्या पैलवानाने पुन्हा मैदानी किंवा गावागावातील कुस्त्या करण्यात काही अर्थ नाही. अण्णा हजारे यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे असे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वक्तव्य केले आहे.

शेतकरी आंदोलनावरून अण्णा हजारे यांनी सुरुवातीला दिलेला आंदोलनाचा इशारा आणि नंतर भाजप नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अण्णांनी आंदोलन मागे घेतल्याच्या भूमिकेवर  विचारलेल्या प्रश्नांला उत्तरं देताना रघुनाथ पाटील म्हणालेअण्णा हजारेंच वय लक्षात घेता त्यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे असे देखील रघुनाथ पाटील म्हणालेत.

काही वर्षांपूर्वी दिल्लीत रामलीला मैदानावर मोठं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाला काही प्रमाणात यश देखील मिळाले.पण आता अण्णा हजारेंच वय झाले आहे, असे म्हणत एकदा का पैलवानाने हिंदकेसरी पद मिळवलं की, त्या पैलवानाने पुन्हा मैदानी किंवा गावागावातील कुस्त्या करण्यात काही अर्थ नाही असा दाखला देत अण्णांनी आता निवृत्ती घ्यावी असा सल्ला रघुनाथ पाटील यांनी दिलाय.

बजेटवर शेतकरी आंदोलनाची छाप

केंद्राचं बजेट शेतकऱ्यांच्यासाठी निराशजनक बजेट असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. आजच्या बजेटवर शेतकरी आंदोलनाची छाप दिसून येत आहे,तसेच आंदोलनाचा दबाव होता, असं मतही रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. धान खरेदीसाठी, सिंचन योजनेसठी नगण्य तरतूद असून शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत करण्यात आली आहे,ती शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी अशी टीका केली आहे. केंद्र सरकारने नोटा छापण्याऐवजी आर्थिक परिस्थिती सुधारावी असा टोलाही रघुनाथदादा पाटील यांनी आजच्या केंद्राच्या बजेटवरून लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या