Ticker

6/Breaking/ticker-posts

दिलासादायक :‘या’ तारखेपासून देणार कोरोनाचा दुसरा डोस .. !


 


 लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : १६ जानेवारीपासून भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाली. यात आरोग्य क्षेत्रासह फ्रंटलाइन वर्कर्सना या लसीचा पहिला डोस दिला जात आहे. आता या मोहिमेअंतर्गत लसीचा दुसरा डोस येत्या १३ फेब्रुवारीपासून दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या सूत्रांनी हे जाहीर केले. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात १६ जानेवारीपासून करण्यात आली होती.

आतापर्यंत या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे. द इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेनुसार, अजूनही देशात मोठ्या लोकसंख्येला कोरोना संसर्गाचा धोका आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणात अनेकांना हा संसर्ग होऊन गेल्याचे आढळले आहे.

गुरुवारी जाहीर आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४५ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. त्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्यक्ष युद्धपातळीवर लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांत ज्येष्ठ नागरिक, तसंच सामान्य नागरिकांना लस दिली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या