Ticker

6/Breaking/ticker-posts

तर.. 'माथाडीं'चे अध्यक्ष गोत्यात येतील

 

खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत मांडला 'माथाडीं'च्या पीएफचा प्रश्न  


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नवी दिल्ली : माथाडी बोर्डाकडून महाराष्ट्रातील माथाडी कामगारांचा पीएफच्या नावाखाली  पैसा गोळा करून तो खासगी बँकांत भरला जातो, असा आरोप एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी  आज लोकसभेत करुन 'या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली तर माथाडी बोर्डाचे अध्यक्ष गोत्यात येतील, असा इशरा दिला आहे.

 \'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन' पक्षाचे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचे यांनी लोकसभेत महाराष्ट्रातील माथाडी कामगारांचा प्रश्न उपस्थित केला. माथाडी बोर्डाकडून पीएफच्या नावाखाली कामगारांचा पैसा गोळा करून तो खासगी बँकांत भरला जातो. हा पैसा ताबडतोब केंद्र सरकारच्या पीएफ खात्यात जमा केला जावा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केलीय.

 'मी अशा लोकांचा प्रश्न उपस्थित करतोय, ज्यांचा आवाज सदनापर्यंत पोहचू शकलेला नाही. महाराष्ट्रात आपल्या डोक्यावर ओझं वाहतात, रेल्वे बोग्यांतून ओझी वाहण्यास मदत करतात किंवा बाजार समित्यांत आत हे लोक काम करतात. अशा हमाल किंवा माथाडी कामगारांचं शोषण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जवळपास २५ वर्षांपूर्वी माथाडी बोर्ड बनवले होते. महाराष्ट्रात जवळपास ३६ माथाडी बोर्ड अस्तित्वात आहेत. पुणे, औरंगाबाद, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती अशा वेगवेगळ्या भागांत हे माथाडी बोर्ड आहेत. गरीब, अशिक्षित माथाडी कामगारांचं शोषण होऊ नये, हा बोर्ड बनवण्यामागचा उद्देश होता. या बोर्डाचा अध्यक्ष हा राजकारणाशी संबंधित असतो' असं म्हणत आपल्या मुद्याला इम्तियाज जलील यांनी सुरुवात केली.

 'सध्याची परिस्थिती अशी आहे की मेहनत करतात आणि आपल्या मेहनतीचे पैसे थेट या माथाडी कामगारांना न मिळता ते बोर्डाकडे जातात. मजुरांच्या मेहनतीचे जवळपास ३० टक्के पैसे बोर्डाकडून आपल्याकडे ठेवले जातात. उरलेले ७० टक्के कामगारांच्या हाती पडतात. मजुरांच्या हक्कांच्या पैशांपैकी ३० टक्क्यांपैंकी १२ टक्के केंद्र सरकारच्या 'एम्प्लॉईज प्रॉव्हिडन्ट फंड'च्या नावाखाली काढला जातो' असं इम्तियाज यांनी लोकसभेत म्हटलं आहे . 

 'कायद्यानुसार, कोणत्याही संस्थेकडे २२ पेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर त्यांच्या पीएफ फंडाची रक्कम केंद्र सरकारच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा केला जावा, अशी तरतूद आहे. परंतु, बोर्डाद्वारे लाखो कामगारांच्या हक्काचा, मेहनतीचा पैसा पीएफच्या नावावर जमा केला जात असला तरी यातील एक रुपयाही केंद्र सरकारच्या पीएफ अकाऊंटमध्ये भरला जात नाही. लवकरात लवकर हा सगळा पैसा खासगी बँकांतून काढून केंद्र सरकारच्या पीएफ खात्यात जमा केला जावा, अशी विनंती इम्तियाज जलील यांनी सरकारकडे केलीय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या