Ticker

6/Breaking/ticker-posts

द बर्निंग मिल : कपाशीच्या गाठी व मशनिरी जळून ४.५ कोटीचे नुकसान..!

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अमरापुर: शेवगाव तालुक्यातील अमरापुर येथील वाय. के.कॉटन अॅण्ड जिनिंग प्रेसिंग मिलला आज सोमवार (दि.२२) रोजी पहाटे आग लागून सुमारे ४ कोटीचे नुकसान झाल्याची घटना घडली . शॉटसर्किटने ही आग लाग्ल्याचे समजते. या आगीत अमरापुर येथील वाय. के.कॉटन अॅण्ड जिनिंग मिल मधील कपाशीच्या गाठी व मशनिरी जळून खाक झाल्या.

        अमरापुर येथे नगर राज्यमार्गालगत असणाऱ्या वाय.के.कॉटन अॅण्ड जिनिंग प्रा.लि.मे.आनंद कॉटन मिलला सोमवारी पहाटे साडेचार वाजता शॉटसर्किटने आग लागली. अमरापुर येथील ग्रामस्थांना घटना समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेऊण आग विझवण्यास मदत केली.त्यानंतर वृध्देश्वर व ज्ञानेश्वर कारखान्याचे अग्निशामक दलाचे पंप घटनास्थळी दाखल झाले.या पंपाच्या सहाय्याणे बारा वाजण्याच्या सुमारास हि आग आटोक्यात आली.मात्र तो पर्यंत कपाशीच्या गाठी व काही मशनिरी जळून खाक झाल्या होत्या. लाखो रुपयांचे नुकसान झाले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या