Ticker

6/Breaking/ticker-posts

कला शिक्षकाने साकारलेल्या ‘हस्तलिखीत ज्ञानेश्वरी’ चा राज्यभर गवगवा..!

 अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील कलाशिक्षक संतोष क्षिरसागर ....!

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 पारनेर: (दादा भालेकर) सुंदर हस्ताक्षरात अडीच वर्षात नऊ हजार ओव्या लिहून ज्ञानेश्वरी चे लिखान पुर्ण करून हस्तलिखीत ज्ञानेश्वरी चा २१ व्या शतकातला अवलिया अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील वासुंदे च्या मातीतला कलाशिक्षक संतोष क्षिरसागर यांचा राज्यभर गवगवा होत आहे.

 वासुंदे (ता.पारनेर)येथील भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेतील कला शिक्षक संतोष पांडुरंग क्षिरसागर हे ग्रामिण भागातील विविध कलाकृती हस्तकौशल्याच्या जोरावर सादर केल्या आहेत.त्या लोकप्रिय ठरत असताना वासुंदे येथील सप्ताहाची पत्रिका देवाची आळंदी येथे राष्ट्रसंत डाँ.नारायण महाराज जाधव यांना देण्यासाठी गेले असता पत्रिकेवरील हस्ताक्षराचे कौतूक करत संत साहीत्याचे गाढे अभ्यासक डाँ.नारायण महाराज जाधव यांनी हस्त लिखीत ज्ञानेश्वरी लिहावी अशी आज्ञा केली होती.याप्रसंगी माऊलींचा आदेश मानून ज्ञानेश्वरी लिहीण्याचे अवघड कामास संत ज्ञानेश्वरांनी ज्या पैस खांबास टेकून ज्ञानेश्वरी लिहीली त्या नेवासे येथे ३१ मार्च २०१५ रोजी प्रारंभ केला.माऊलींचा आर्शिवाद घेवून थेट वासुंदे गाठले.शाळेच्या कामात व्यत्यय येवू नये म्हणून दररोज पहाटे साडेपाच ते साडेसात यावेळेत ज्ञानेश्वरी लिहीण्याचे काम त्यांनी हाती घेतले.शाईपेनने लिहीताना वेगवेगळे अक्षर येवू नये म्हणून त्यांनी बावीस पेन व तीन शाईचे बाँक्स घेतले होते.त्यामुळे त्यांनी हाताने लिहीलेली ज्ञानेश्वरी एकाच हस्ताक्षरात सुबक व अत्यंत्य कलाकुसरीच्या अक्षरात जशीच्या तशी लिहीली आहे.

 जिथं प्रेरणा तिथं उर्जा - ह.भ.प.डॉ.नारायण महाराज जाधव

 हस्तलिखित श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे औपचारिक प्रकाशन  प्रेरणास्थान ह.भ.प.डॉ.नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते श्री क्षेत्रआळंदी येथे ग्रंथाची विधीवत पूजा करुन झाले.एक ग्रंथ श्री क्षेत्र आळंदी येथे माऊलीं चरणी समर्पित करण्यात आला.गुरुवर्य कृष्णकृपांकित ह.भ.प. डॉ.विकासानंद महाराज यांनी ही ग्रंथाची विधीवत पूजा करून पुढील सत्कार्यास प्रेरणा व शुभेच्छा देऊन ग्रंथवितरणास आशीर्वाद दिले.जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे व पद्मश्री पोपटराव पवार,ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांनी संतांचे विचारच समाजाला तारु शकतील यासाठी एक तरी ओवी अनुभवावी असे मत व्यक्त केले व पुढील कार्यासाठी कृपाशीर्वाद देऊन सहकार्य व हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथासंदर्भात दिलेली प्रेरणा म्हणजे जिथं प्रेरणा तिथं उर्जा होय.

वासुंदे गाव राज्याच्या कॅनव्हासवर..

 कला क्षेत्रात वासुंदे गावाचे नाव संपूर्ण राज्याच्या कॅनव्हासवर उमटवणारा उत्कृष्ठ चित्रकार संतोष क्षीरसागर यांचा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड,खासदार सुप्रिया सुळे, यांनी केला सन्मान...! कला क्षेत्रात वासुंदे गावाचे नाव संपूर्ण राज्याच्या कॅनव्हासवर,यशस्वीपणे उमटवणारे,पारनेर तालुक्यातील वासुंदे गावचे सुपुत्र, कुंचल्याचे कलाकार,उत्कृष्ठ चित्रकार संतोष पांडुरंग क्षीरसागर यांचा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे राष्ट्रसंत डाँ.नारायण महाराज जाधव यांसह  
शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड,यांचे वडील मुंबई काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड,खासदार सुप्रिया सुळे,पारनेरचे आमदार निलेश लंके,जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील,जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे,माजी सरपंच प्रतापराव पाटील,श्री स्वामी समर्थ बँकेचे चेअरमन अँड.अशोक शेळके आदी विविध मान्यवरांकडून भव्य सन्मान झाला असून विशेष पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

 हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे ग्रंथाचे कौतुक यशवंतराव चव्हाण केंद्र,नरीमन पाॅईंट मुंबई येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी सन्मान व विशेष पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड  यांचे वडील मुंबई काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे हस्ते हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या निमित्ताने सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे पेंटिंग भेट म्हणून देण्यात आले.यावेळी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी कलाशिक्षक म्हणून प्रमाण पत्र देऊन संतोष क्षीरसागर यांचा सत्कार केला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या