Ticker

6/Breaking/ticker-posts

सोशल मीडियावर पोस्ट टाकताना आता 'हे' सांगणे बंधनकारक

 

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

  नवी दिल्ली :   सोशल माध्यमांवर पारदर्शकता आणण्यासाठी अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय)  डिजिटल मीडियावर इन्फ्लुएन्सर अॅडव्हर्टायझिंगची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जनमानसावर परिणाम करणाऱ्या पोस्टचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांची ओळख पटविणेही अवघड होऊन बसते. मात्र, आता नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टाकण्यात आलेली पोस्ट व्हिडिओ, जाहिरात किंवा साधी पोस्ट आहे अथवा नाही, आता सांगावे लागणार आहे. नवी मार्गदर्शक तत्त्वे यूट्यूब, ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटसह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी अनिवार्य आहेत. सर्व प्रकारचा पेड कंटेंट, ऑनलाइन जाहिराती करताना त्यांचा नेमका प्रकार जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


मार्गदर्शक तत्त्वे
३१ मार्चपर्यंत अंतिम होणार

डिजिटल मीडियावर इन्फ्लुएन्सर अॅडव्हर्टायझिंगची मार्गदर्शक तत्त्वे अंतिम होण्यापूर्वी त्याचा उपयोग करणाऱ्या सर्वांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. त्यांना आपली मते नोंदविण्यासाठी ८ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आलेली मते आणि सरकारचे धोरण या आधारावर ३१ मार्चपर्यंत तत्त्वे अंतिम करण्यात येणार आहेत. मार्गदर्शक तत्त्वे अंतिम केल्यानंतर १५ एप्रिल २०२१ रोजी आणि त्यानंतर सोशल माध्यमांवर प्रसारित करण्यात येणाऱ्या सर्वप्रकारच्या प्रमोशनल पोस्टवर ती लागू असणार आहेत, असेही एएससीआयने स्पष्ट केले आहे.

व्हिडिओसाठी स्वतंत्र नियम
सोशल माध्यमांवर व्हिडिओ जारी करताना तो नेमक्या कशासंदर्भात आहे, याची माहिती वाचता येईल अशाप्रकारे देणे आवश्यक आहे. पंधरा सेकंद अथवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या व्हिडिओची माहिती किमान दोन सेकंद दृश्य स्वरूपात राहणे आवश्यक आहे. संबंधित माहिती व्हिडिओच्या एकूण लांबीच्या एक तृतीयांश वेळ असली पाहिजे. सोशल माध्यमांवरून लाइव्ह करताना माहितीचे लेबल वेळोवेळी दाखवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

लाढाल एक हजार कोटींची
डिजिटल मार्केटिंग एजन्सी अॅडलिफ्टच्या मते भारतीय इन्फ्लुएन्सर बाजाराची वार्षिक उलाढाल ५४३ कोटी रुपये ते १०८७ कोटी रुपयांच्या घरात आहे. देशामध्ये सोशल मीडियाचा उपयोग करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असून, बाजारातील उलाढालही वाढत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या