Ticker

6/Breaking/ticker-posts

फायनान्स कंपन्यांनी पारदर्शक कारभार करावा - मुंडे

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगांव-  नागरीकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी फायनान्स कंपन्या या उपयोगी पडत आहेत,त्यांनी अधिक पारदर्शक पद्धतीने कामकाज करून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे (दक्षिण) जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले.

 शहरातील मिरी रस्त्यावर नव्याने सुरु झालेल्या सुधा मायक्रो फायनान्स प्रा.लि. चे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष मुंडे यांच्या हस्ते झाले ,त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी नगरसेवक शब्बीर शेख होते.

पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, सर्व सामान्याना सावकारी पाशातून दिलासा व आधार देण्याचे काम हे सहकारी बॅका व पतसंस्थांनी केले आहे किंबहुना ग्रामीण भागातील  सर्वसामान्य व शेतकरी उभा करण्यात या चळवळीचा सिंहाचा वाटा आहे . अलिकडच्या काळात त्यात थोडाफार  बदल होऊन मल्टिस्टेट व मल्टिसिटी आणि विविध फायनान्स कंपन्या मार्केट मध्ये उतरल्या ही बाब समाधानकारक असली तरी तेवढीच जोखमीची आहे . गेल्या काही वर्षातील घोटाळे पाहता सर्व सामान्य कर्जदार भ्रमीत झाला आहे . त्यामुळे फायनान्स कंपन्यांनी आपली उपयोगिता सिद्ध करतांना ग्राहकांचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन करून येणारा काळ मग तुमचाच असे परखड मत मुंडे यांनी व्यक्त केले .

कंपनीचे अध्यक्ष संदीप वर्मा व व्यवस्थापक अजित भामा यांनी संस्थेमार्फत महिला बचत गट,दुकानदार यांना तसेच सोनेतारण,मालमत्ता यावर कर्ज देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी कमलेश लांडगे,समीर शेख,निजाम पटेल,वहाब शेख,कैलास थोतार,इक्बाल शेख,उषा शिंदे,इसाक शेख,अशोक शिंदे उपस्थित होते.जावेद सय्यद यांनी प्रास्तविक केले,श्गाखा व्यवस्थापक मोईस सय्यद यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या