Ticker

6/Breaking/ticker-posts

खूनाचा गुन्हा दाखल करण्यास विलंब ; सहायक पोलिस निरीक्षक पाटील निलंबित

 

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर :- खुनाचा गुन्हा दाखल करण्यास उशीर लावून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यास उशीर केल्याने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत शनिवारी (दि. ६) रात्री उशिरा आदेश काढले आहेत. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. 21 फेब्रुवारी 2017 रोजी मयत रमेश उर्फ रमाकांत काळे (वय 35,रा. द्वारकाधिश कॉलनी, आलमगीर,भिंगार) यांना आरोपी जावेद रौफ शेख (रा. मोमीन गल्ली, भिंगार) त्याच्या साथीदारांनी काळे यांना माझी बकरी मेलेली आहे. ती बकरी तुम्हाला देतो असे सांगून दुचाकीवर बसून काटवनात घेवून जात मारहाण करून दारू पाजली.

मारहाणीत मार लागल्याने काळे यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान काळे यांचा मृत्यू झाला. काळे यांच्या मृत्यूनंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातआकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी यांनी काळे यांचा मृत्यू मारहाणीमुळे तसेच दारू पाजल्याने व दारूमध्ये विषाचे अंश आढळून आल्याने झाला असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे 20 डिसेंबर रोजी कॅम्प पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खूनाचा गुन्हा दाखल करण्यास विलंब करणे, यासह आरोपीवर वेळेत कारवाई न करणे असा ठपका पाटील यांच्यावर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या