Ticker

6/Breaking/ticker-posts

'गाय छाप' वर आयकरचा ' जर्दा छापा' !


 लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 संगमनेर : राज्यातच नव्हे तर परराज्यातही गेल्या 70 वर्षांपासून तंबाखू व्यवसायातील प्रसिद्ध नाव असलेल्या 'गाय छाप' तंबाखूच्या म्हणजेच मालपाणी उद्योग समूहाच्या मुख्य कार्यालयासह तब्बल 34 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. 17 डिसेंबरला छापा घालत कारवाई केल्याच समोर आलं आहे. संगमनेर, पुणे व पाथर्डी यासह राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या 34 कार्यालयांवर आयकर विभागाने एकाच वेळी छापा सत्र केले. जवळपास तीन दिवस चाललेल्या या कारवाईत आयकर विभागाच्या अनेक टीम सहभागी झाल्या होत्या.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयकर विभागाच्या औरंगाबाद टीमने कारवाई करताना जवळपास 243 कोटी रुपयांची बेहिशेबी तंबाखू विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. हस्तलिखित व एक्सेल शीटमधील तपासात ही माहिती समोर आली आहे. याशिवाय बांधकाम क्षेत्रात सुद्धा अशाच पद्धतीने 40 कोटींच्या हिशोबाची अनियमितता आढळून आली आहे. प्राथमिक स्वरूपातील ही माहिती असून याबाबत औरंगाबाद अथवा आयकर विभागाच्या ऑफिसमधून निश्चित माहिती मिळालेली नाही.

कोरोना काळात मालपाणी समुहाने केली होती 1कोटींची मदत

मालपाणी उद्योग समूहाच्या वतीनं कोरोना काळात 50 लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर 50 लाख पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्यात आले आहेत. याशिवाय 25 लाख रुपये कोरोना काळात स्थानिक ग्रामीण रुग्णालय व विविध संस्थांना देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी राम मंदिर निर्माणासाठी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात 1 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने तंबाखू व्यवसायाव्यतिरिक्त शिर्डी येथे वॉटर पार्क व लोणावळा येथे वॉटर पार्क व अमेजॉन पार्क उभारण्यात आला आहे. तर पुणे आणि नाशिकमध्ये रियल इस्टेट व्यवसायातही मोठे प्रोजेक्ट्स सध्या सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या