Ticker

6/Breaking/ticker-posts

कांद्याचे भाव कोसळले..!

 


लोकनेता न्यूज  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर:-
गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये चढउतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच चार हजार पार करून गेलेला कांद्याचे दर आता कोसळले आहे.

नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याच्या भावात घसरण झाली. काल जास्तीत जास्त 3300 रुपयांपर्यंत भाव निघाले. शनिवारी (दि.6 फेब्रुवारी) रोजी 21 हजार 839 गोण्या कांद्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला 3000 ते 3300 रुपये भाव मिळाला. दोन नंबरला 2500 ते 2800 रुपये, गोल्टी कांद्याला 2800 ते 3000 रुपये, जोड कांद्याला 1300 ते 1500 रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 1000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. आठवड्यात कांद्याच्या भावात वाढ व घसरण दोन्ही आढळून आली. सोमवारी भाव जास्त भाव 3300 रुपयांपर्यंत निघाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या