Ticker

6/Breaking/ticker-posts

घोडेगावात लाल कांद्याने "भाव खाल्ला" .. वाचा आजचा बाजार ..

 ११० ट्रक कांदा आवक ; ४१०० रुपये भाव
आवक कमी झाल्याने भाववाढ

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

घोडेगाव :-कृषि उत्पन्न बाजार समिती नेवासा उपाआवार घोडेगाव येथे सोमवार दि १ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या लिलावात लाल कांद्यास ४१०० रुपये क्विंटल पर्यंत भाव निघाले .

घोडेगाव कांदा मार्केट मध्ये सोमवारी एकुण १९७७२ गोणी कांद्याची आवक झाली होती . मागील मार्केट पेक्षा कमी कांदा विक्री साठी आला होता.लाल कांद्यास ४१०० रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला .अनेक दिवसानंतर पुन्हा भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले .

          युवा नेते उदयन गडाख यांची बाजारात भेट ; चांगला दर देण्याच्या केल्या होत्या सूचना .युवा नेते उदयन गडाख यांनी शुक्रवारी घोडेगाव बाजारात भेट देऊन बाजार व कांदा मार्केटची पाहणी केली. शेतकरी ,व्यापारी यांच्या सोबत बसून अडचणी समजून घेतल्या ,तसेच कांदा व्यापारी यांना शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याच्या सूचना देखील केल्या होत्या .आज कांद्यास ४१०० रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी उदयन गडाख यांचे अभिनंदन केले व आभार मानले

 

सोमवारचे कांदा बाजार भाव .

मोठा माल   - ३५०० -३८००

मध्यम मोठा - ३४०० -३५००

मध्यम  माल - ३२०० -३४००

गोल्टा/गोल्टी - २५००-३२००

१/२ वक्वल -३८०० - ४०००

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या