लोकनेता न्यूज
मुंबई :- नेवासा तालुक्याचे आमदार व
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्याला यश आले असून
त्यांनी तालुक्यातील महत्वाच्या सर्व रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटी रुपयांचा
घसघशीत निधी मिळविल्याने संपूर्ण तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.
मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले असून तालुक्यातील सर्व महत्वाच्या रस्ता कामांसाठी थोडा न थिडका तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी मिळविण्यात त्यांना यश मिळाले आहे. नेवासा तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली होती. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील लोकांनी प्रामुख्याने या प्रश्नाकडे तत्कालीन अपक्ष उमेदवार गडाख यांचे लक्ष वेधून रस्त्यावरील खड्ड्यांच्या साडेसातीतून सुटका करण्याचे साकडे घातले होते. त्यावेळी हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचे वचन गडाख यांनी दिले होते. मात्र कोविड-19च्या पार्श्वभूमीवर देशभरात पाळण्यात आलेल्या अभूतपूर्व लॉकडाऊनमुळे वचनपूर्ती करण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र लॉकडाऊन शिथील होताच राज्याचे कॅबिनेट मंत्री बनलेल्या गडाख यांनी तालुक्यातील सर्व महत्वाच्या रस्ता कामांचा आराखडा बनविण्याचे आदेश देऊन त्यास प्रशासकीय मंजूरीही मिळविली होती. मात्र प्रत्यक्ष कामास निधी मिळण्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण मोठा पाठपुरावा करावा लागला.
तब्बल
56
कोटी 52 लाख रुपये एकट्या श्रीरामपूर-शेवगांव
राज्य मार्गावरील पाचेगांव फाटा ते कुकाणा दरम्यानच्या साडेतेहतीस किलोमीटर रस्ता
कामासाठी मिळाले आहेत. त्याचबरोबर सोनई ते घोडेगांव (नगर-औरंगाबाद महामार्ग) या
रस्ता कामासाठी 6 कोटी 40 लाख, खडका फाटा ते तुळजाईवाडी रस्ता कामासाठी 2 कोटी 50
लाख, सलाबतपूर-शिरसगांव ते गोपाळपूर-खामगांव
या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 50 लाख,
तामसवाडी-धनगरवाडी ते खुपटी रस्ता कामासाठी 2 कोटी
रुपये, मोरेचिंचोरे ते सोनई रस्ता कामासाठी 2 कोटी 50 लाख, वडाळा बहिरोबा ते
रांजणगांव रस्त्यावरील कॅनालपासून ते कारेगांव पर्यंतच्या रस्ता कामासाठी 2
कोटी 30 लाख, कारेगांव
ते सौंदाळा (राज्य मार्ग 50) कामासाठी 2 कोटी, सोनई अर्बन बँक ते विवेकानंद चौक रस्ता
काँक्रीटीकरणासाठी 88 लाख रुपये, दहीगांव-कुकाणा
मार्गावरील शेवगांव हद्द ते कुकाणा या रस्ता कामासाठी 1 कोटी
76 लाख रुपये, जळके बुद्रुक ते
गोगलगांव रस्ता 50 लाख, नेवासा-हंडीनिमगांव
ते भानसहिवरा रस्ता 2 कोटी 40 लाख,
भानसहिवरे ते रांजणगांवदेवी रस्ता 2 कोटी 50
लाख, रांजणगांवदेवी ते घोडेगांव-कुकाणे रस्ता 2
कोटी 50 लाख, करजगांव ते
देवखिळे वस्ती रस्ता 2 कोटी 40 लाख,
माका ते पाचुंदा रस्ता 2 कोटी 10 लाख, प्रजीमा 31 लोहोगांव,
प्रजीमा 35 शिंगवेतुकाई, लोहारवाडी, चांदा ते राष्ट्रीय महामार्ग 66 रस्ता (प्रजीमा 183) किमी 0/00 ते 5/00 यामध्ये सुधारणा करणे 2 कोटी 40 लाख, चांदा ते
रस्तापूर रस्ता 1 कोटी 26 लाख, सोनई-शनिशिंगणापूर, चांदा रस्ता (प्रजीमा 79)
किमी 10/00 ते 11/400 मध्ये
सुधारणा करणे (चांद्यापर्यंत) 1 कोटी 20 लाख, असा तब्बल शंभर कोटींचा भरभक्कम निधी प्राप्त
झाला असून येत्या काही दिवसांतच या रस्त्य़ांच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
0 टिप्पण्या