Ticker

6/Breaking/ticker-posts

'खरवंडी कासार' ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रदिप पाटील तर उपसरपंचपदी दिलीप पवळे

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 खरवंडी :-पाथर्डी तालुक्यातील पुर्व भागात बाजारपेठेचे व राजकीय दुष्टया महत्वाचे समजल्या जाणाऱ्या  खरवंडी कासार ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संत जर्नाधन स्वामी पॅनलचे  प्रदीप पाटील तर उपसरपंचपदी दिलीप पवळे यांची बिनविरोध निवड झाली

       पाथर्डी तालुक्यातील महत्वाची बाजार पेठ असणाऱ्या व राजकीय दृष्टया महत्वाची समजल्या जाणाऱ्या खरवंडी कासार ग्रामपंचायत मध्ये या वर्षी सतांतर होऊन  कै . सुभाषराव पाटील ( रावसाहेब अप्पा ) यांना मानणाऱ्या  संत जनार्धन स्वामी पॅनल ला  यावर्षी स्पष्ट बहुमत मिळाले   राजेंद्र जगताप व प्रदीप पाटील व दिपक पाटील  यांनी नियोजण करत  सत्ता सपांदन केली

         मागील वेळी सतत असणारी सत्ता व अतंर्गत बंडाळी चा फटका बसल्याने  या ग्रामपंचायतच  निवडणुकीत सत्तातर झाले होते  . खरवंडी कासार ग्रामंपचायत वर सत्तर वर्ष असणारी पाटील घराण्याची सत्तापुष्टात आली होती ति पुन्हा  या वर्षी  कै सुभाषराव पाटलाना मानणारा  पॅनल बहुमता मध्ये आल्याने सरपंच पदी प्रदीप पाटील यांची निवड झाली तर मागील दहा वर्ष  पासुन ग्रामपंचायत सदस्य असणारे दिलीप पवळे यांची उपसरपंच म्हणुन बिनविरोध निवड झाली 

    ११ सदस्य सख्यां असणाऱ्या या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये  खरवंडी कासार गावातुन ८ पैकी ७ सदस्य हे संत जर्नाधन स्वामी पॅनल चे विजयी झाल्याने या पॅनल कडे स्पष्ट बहुमत प्राप्त झाले होते गावात  वॉर्ड क्रं २ मधुन  प्रदीप पाटील सौ नंदा सागंळे वॉर्ड क्र३  मध्ये सौ . सविता अंदुरे  बाळासाहेब जगताप  वॉर्ड क्रं ४ मध्ये दिलीप पवळे . युसुफ बागवान शशीकला सोनवणे  विजयी झाल्या तर वॉर्ड क्रं २ मध्ये 

अपक्ष असणारे सौ अजंली  दिपक ढाकणे व सौ पुजा किरण अंदुरे यांना समान मत पडल्यामुळे चिठ्ठी द्वारे निवड होऊन अजंली दिपक ढाकणे  विजयी झाल्या होत्यातर खरवंडी कासार ग्रुप ग्रामपंचायत मधील काटेवाडी ढगेवाडी तुळजवाडी वॉर्ड क्र १ मधुन सविता मिथुन डोगंरे कमलबाई   बाबासाहेब ढाकणे सचीन  ढोले विजयी झाले होते यापैकी सचीन ढोले यांनी ही जनार्धन स्वामी पॅनल ला सरपंच निवडणुकी पुर्वीच पाठीबां दिला होता

    सरपंच पदासाठी प्रदीप पाटील तर उपसरपंच पदासाठी दिलीप पवळे याचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने  निवडणुक निर्णय अधीकाऱ्यानी निवडीची घोषणा केल्यानतंर कार्यकर्त्यानी जल्लोष केला सरपंच उपसरपंच यांचा ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसेवक अशोक दहीफळे यांनी सत्कार केला यावेळी  उपस्थित ग्रामस्थांनी सर्व निर्वाचित पदाधीकाऱ्याचा सत्तकार केला मोहटा  देवी चे माजी विश्वस्त भास्करराव सागंळे वृध्देश्वरचे सचांलक बाळासाहेब गोल्हार दिपक ढाकणे बाबासाहेब ढाकणे यांनी मनोगत व्यक्त केले . सरपंच प्रदीप पाटील व उपसरपंच दिलीप पवळे यांनी स्वच्छ व पारदर्शक काम करण्याचे अश्वासण उपस्थित ग्रामस्थाना दिले 

    
निवडणुकी पुरते असलेले मतभेद बाजुला ठेवत गाव विकासासाठी विरोधाला विरोध न करता चागंल्या कामाला पाठिबां देत हाताहात घालुन काम करू असे मिथुन डोगंरे सर यांनी मनोगत व्यक्त केले
 यावेळी  राजेद जगताप सलीम बागवान  कानीफ सोनवणे माणिक अंदुरे लक्ष्मण राऊत दौलत सोणवणे भगवान पवळे अबांदास राऊत महमंद सय्यद प्रकाश अंदुरे संतोष अंदुरे चैत्यण्य पाटील किशोर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते 

गावविकासाठी सर्वाची  मदत घेऊन विकास करू

खरवंडी  कासार ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षीय स्वरूप नसते  गाव पातळी वरच  स्थाणीक समंधावर पॅनल तयार करून निवडणुक होत असते त्यामुळे हि ग्रामपंचायत या पक्षाकडे त्या पक्षाकडे असे स्वरूप होत नाही परंतु काल सरपंच निवडी नतंर काही वक्त्यानी मनोगत व्यक्त करताना त्यास  पक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला तेव्हा उपसरपंच दिलीप पवळे व भास्करराव सागंळे यांनी आपल्या मनोगता मध्ये  पक्षीय भेद बाजुला करत आम्ही स्थाणीक पातळीवर आघाडी करत निवडणुकीला सामोरे गेलो आहोत व गावविकासाठी सर्वाची  मदत घेऊन विकास करू असे स्पष्ट केले 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या