Ticker

6/Breaking/ticker-posts

लुटले !.. मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या चालकाला..!!

 

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 सुपा :- नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथील समिर आंबे यांच्या गजाननकृपा पेट्रोलियम या पेट्रोलपंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव सागर मोरे यांच्या वाहनाचा चालक अरूण गौतम भोले यास अज्ञात इसमांनी सोमवारी पहाटे मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक सागर मोरे यांचे सरकारी  वाहनाचा (क्र. एम एच ०३ डी ए ७०८१) चालक अरूण गौतम भोले (हल्ल्ली रा. वाशी नाका, न्यु आर्यन पार्क,माउस रोड बिल्डींग, चेंबूर, मुंबई, मुळ रा.खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) हा रविवारी सरकारी वाहनासह त्याच्या गावी बीड येथे गेला होता. तेथील काम आटोपून रात्री तो मुंबईकडे जाण्यासाठी निघाला असता उशिर झाल्याने नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथील समिर आंबे यांचा गणेश कृपा पेट्रोलियम या पंपावर गाडी लाऊन भोले हा रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झोपला.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरटे वाहनाजवळ आले. काचेवर आवाज करून त्यांनी भोले यांना उठविले. वाहनातून बाहेर येण्यास भाग पाडून चोरटयांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. भोले यांच्या गळयातील चार तोळे वजणाची सोन्याची चेन काढून घेत खिशातील सात हजार २०० रूपये देखील चोरटयांनी काढून घेतले. तेथून जाताना त्यांनी सरकारी वाहनाची चावीही ताब्यात घेतली.

भोले यांना लुटल्यानंतर सुपे परिसरातील दौलत पंपाजवळ त्याच चोरटयांनी संजय ठकाजी नानोर (रा. डिग्रस, राहूरी) या पिकअप चालकास आडवून त्यास मारहाण करीत त्याच्या जवळील चार हजार रूपये काढून घेतले. 

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या