Ticker

6/Breaking/ticker-posts

ट्रक - क्रूझर धडक ; 3 जणांचा जागीच मृत्यू, 7 जखमी

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

औरंगाबाद : राज्यात गेल्या काही दिवसांपासून  समोर येत आहेत. अशात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात आणखी एक काळजाचा ठोका चुकावणारा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि क्रूझर वाहनात अपघात झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आली. सगळ्यात धक्कादायक बाबा म्हणजे लग्नासाठी निघालेल्या गाडीचा हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ या दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली. ही धडक इतकी मोठी होती की यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली असून तात्काळ पोलिसांना आणि रुग्णालयाला पाचारण करण्यात आलं.

 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 7 जखमींना तातडीने नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून तीन जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तर सदर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

 

लग्न समारंभासाठी निघालेल्या गाडीवर काळाचा घाला बसल्याने कुटुंबियांमध्ये दुखाचं वातावरण आहे. तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अपघाताचा पोलीस तपास करत असून नेमकी धडक कशी झाली आणि दोन्ही वाहनांचा वेग जास्त होता का? याची चौकशी करत आहे. यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या