Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव : मौजे राणेगाव येथे 100 के.व्ही. द्या - अॅड शिवाजीराव काकडे

 अॅड शिवाजीराव काकडे यांची उपकार्यकारी अभियंता एस एम लोहारे यांच्याकडे मागणी

 लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

शेवगाव : -शेवगाव तालुक्यातील अनेक  गावातील ट्रांसफार्मर जळल्यानंतर नवीन बसून देण्यासाठी तालुक्यातील अधिकारी ढकलाढकली चे काम करत आहेत ज्या गावातील ट्रांसफार्मर जळालेले आहेत तेथे नवीन ट्रांसफार्मर तात्काळ बसून देण्यात यावे।  अशा मागणीचे निवेदन अॅड. शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली राणेगाव येथील ग्रामस्थांनी शेवगावचे उपकार्यकारी अभियंता एस.एम. लोहारे यांना देण्यात दिले .

 निवेदनात म्हटले आहे की,   मौजे राणेगाव येथे बेंद वस्तीवरील डी.पी. वर ६३ के.व्ही.चा ट्रान्सफार्मर आहे. सदरच्या डी.पी.वर अंदाजे १०० हुन अधिक शेतकरी ग्राहक आहेत.यामुळे लोड येऊन वारंवार ट्रान्सफार्मर जळत असल्याने टोणपे वस्ती येथे नवीन १०० के.व्ही. चा ट्रान्सफार्मर जोडण्यात यावे ॰ ट्रान्सफार्मरवर सतत लोड येत असल्याने कोणाच्याही मोटरी चालत नाहीत. पिके लाईट नसल्याने पाण्याअभावी जळू लागली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना मुकावा लागेल. डी.पी.वर लोड जास्त असल्याने काही ठिकाणी विद्युतवाहक तारा तुटणे, डी.पी. जळणे अशा घटना वारंवार होत आहेत. ग्रामस्थांची खूप दिवसाची मागणी आहे की, बेंदवस्ती  डी.पी. वरील लोड कमी करून जवळच गट नंबर ५१२ मध्ये टोनपे वस्तीवर एक नवीन १०० चा ट्रांसफार्मर मिळावा. 

टोणपे वस्तीवर एक २५ चा अक्षय प्रकाशचा सिंगल फेजचा ट्रान्सफार्मर जोडण्यात यावा. यासाठी सर्व शेतकरी नवीन कोटेशन भरण्यास तयार आहोत. जर नवीन ट्रान्सफॉर्मर झाला तर बेंद वस्तीवरील डी.पी. वरचा प्रचंड मोठा लोड कमी होऊन ती सुद्धा व्यवस्थित चालेल व लोकांची होणारी हेळसांड कमी होतील. तरी मौजे राणेगाव ता. शेवगाव येथील बेंद वस्ती डी.पी. वरील प्रचंड मोठा होणारा लोड कमी करून टोणपे वस्ती गट नंबर ५१२ येथे एक नवीन १०० चा ट्रान्सफार्मर तसेच व एक २५ चा अक्षय प्रकाशचा सिंगल फेजचा ट्रान्सफार्मर जोडण्यात यावा. अशी मागणी राणेगाव ग्रामस्थांनी यावेळी निवेदनातून केली आहे. 

चापडगाव व बोधेगाव सबटेशन अंतर्गत अनेक गावांमध्येही हीच समस्या आहे. राणेगाव सह बाकी ठिकानच्या ट्रान्सफार्मरवरील लोड कमी करून शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा कसा करता येईल याकडे विद्युत मंडळाने लक्ष दिले पाहिजे. जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजय आंधळे म्हणाले.

 निवेदनावर एकनाथ गाढवे, महादेव खेडकर, नवनाथ खेडकर, नारायण गाढवे, राजेंद्र बिबे, नवनाथ बिबे, कानिफनाथ खेडकर, भागवत मुलमुले, बाळासाहेब भालेराव, गोरख वाघ, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजय आंधळेम्हातारदेव आव्हाडनवनाथ खेडकर यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.

          चा

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या