Ticker

6/Breaking/ticker-posts

दादा आमचं पेन्शनचं तेवढं बघा

 


 

ज्येष्ठ पत्रकारांना सरसकट पेन्शन मिळावी

शासन जाचक नियम -अटींच्या त्रूटी दूर कराव्यात -

मराठी पत्रकार परिषदेची मागणी

लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

अहमदनगर : - मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचा नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांनी त्यांचा सत्कार करुन ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन चं तेवढं बघा अशी साद घातली . याप्रश्‍नी निवेदन दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.

एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री ना. पवार शहरात आले असता त्यांना सदरचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकारने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु केली आहे. ही पेन्शन मिळण्यासाठी शासनाच्या जाचक नियम व अटी असल्यामुळे मोजक्याच ज्येष्ठ पत्रकारांचा त्यात सामावेश झाला आहे . त्यामुळे अनेक ज्येष्ठ पत्रकार या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत . यामध्ये शासनाने व विशेषतः आपण स्वतः या प्रश्नी  लक्ष घालून सदरील त्रुटी दूर करून मार्ग काढावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या