Ticker

6/Breaking/ticker-posts

‘यांनी’ आदेश दिला तर जिल्हा बॕकेची निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार

                                                                     लोकनेता न्यूज

  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

काष्टी :-जिल्हा बॕकेची रणधुमाळी सुरु झाली असताना २१ जागा साठी १९५ उमेदवार रिगंणात आहे.यामध्ये  आपणही फाॕर्म भरला आहे.परंतु खासदार सुजय विखेपाटील व आमदार बबनराव पाचपुते यांनी जर आदेश दिला तर आपण जिल्हा बॕकेची निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विद्यमान संचालक वैभव पाचपुते यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील रहिवासी वैभव पाचपुते  यांनी नुकताच कार्यकर्त्यांसह जावून जिल्हा बॕकेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वैभव पाचपुते हे आमदार बबनराव पाचपुते गटाचे अतिशय  विश्वासू कार्यकर्ते  आहेत म्हणून  तालुक्यातून माजी आमदार राहुल जगताप,अनुराधा राजेंद्र नागवडे, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार,अर्चना दत्तात्रय पानसरे, प्रविण कुरुमकर यांच्यासह   अनेक मान्यवर व्यक्तीनी उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्ठीकडे उमेदवार  मिळविण्यासाठी इच्छा व्यक्त केली असताना  बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते याची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.म्हणून  भाजपकडून खासदार सुजय विखे आणि आमदार पाचपुते यांनी जर आपल्याला आदेश दिलातर आपण जिल्हा  बॕकेची निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार असे वैभव पाचपुते यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितले यावेळी खुलेश्वर संस्थेचे अध्यक्ष सुनिल दरेकर,सदस्य अॕड.महेश दरेकर,जयवंत बोत्रे अमोल पाचपुते यांच्यासह मान्यवर हजर होते. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या