Ticker

6/Breaking/ticker-posts

वीजपुरवठा खंडित करू नका या मागणीसाठी भाजयुमो व मनसेचा मोर्चा

 

लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

पाथर्डी :-  चुकीच्या वीजबीलाच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने तालुक्यातील घरगुती व शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम सुरु केली आहे ती तातडीने थांबवावी अशी आग्रही मागणी करत आज वीज वितरण कार्यालयावर मनसे व भाजयुमोच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजयुमोचे अमोल गर्जे,मुकुंद गर्जे,मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, शहराध्यक्ष सुभाष घोरपडे सामाजिक कार्यकर्ते इजाजभाई शेख यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात रिपाइं चे महेश अंगारखे, युवासेनेचे सचिन नागापुरे, यांच्या सह अनेक युवक व नागरिक सहभागी झाले होते. 

यावेळी बोलताना मुकुंद गर्जे , मनसेचे संतोष जिरेसाळ यांनी विज वितरण चे अभियंता मोरे यांच्या शी  बातचीत केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या व विज ग्राहकांच्या समस्या व विज वितरण कंपनी कडुन होत असलेल्या सक्तीच्या व अन्यायकारक वसुली संदर्भात आपल्या मागण्या आक्रमकपणे मांडल्या. यावेळी सर्वच आंदोलक आक्रमक झाले होते. मनसेचे तालुकाध्यक्ष जिरेसाळ यांनी सांगितले की काल आम्ही पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर यांना निवेदन दिले आहे. कोरोना काळामुळे सर्व सामान्य माणसाची अार्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली अाहे,मात्र याच काळात वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना कोणतीही सवलत न देता व मीटर रिडींग न घेता सहा महिन्याचे एकत्रित असे भरमसाठ वीज बिल पाठवुन कंबरडे मोडले आहे. विज मंत्र्यांनी जाहीर करून ही वीज बिल दुरूस्ती न करता वीज कनेक्शन तोडत कंपनी वसुली करत आहे. ते तातडीने थांबवा. अन्यथा शेतकरी व जनतेचा जनक्षोभ  होईल. आपल्या मंडळाच्या तांत्रिक चुकीचा भार सामान्य जनतेवर लादु नका. 

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे म्हणाले की, सरकार ने वेळोवेळी सांगितले की वीज बिलात सवलत देऊ व त्या फसव्या आश्वासनावर सामान्य नागरिकांनी विस्वास ठेवुन बील भरले नाही पंरतु कोणतीही सुट न देता वीज वितरण कंपनीने पठाणी पद्धतीने वीजबील वसुली चालु केली. व सामान्य माणसाला रडायला लावले आहे. यापुढे असले फसवणुकीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.अन्याय सहन केला जाणार नाही. सामान्य माणसासाठी प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी मागेपुढे पाहणार नाही. पंरतु सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देऊ 

यावेळी अमोल गर्जे यांनी सांगितले की वीजबिल दुरूस्त करून टप्याटप्याने बीले स्वीकारावी. शेतकर्यांचे कनेक्शन ताबडतोब जोडुन द्यावीत व त्यांना मदत करावी अन्यथा आधीच देशोधडीला लागलेला सामान्य माणूस व गरीब शेतकरी आत्महत्या करतील त्यामुळे सक्तीची वसुली थांबवून ताबडतोब वीजपुरवठा पुर्ववत करावा. अन्यथा यापेक्षा ही तिव्र आंदोलन केले जाईल. 

            शेतकर्यांना अात्महत्येला प्रवृत्त करण्याचे पाप हे शासन  व वीज वितरण कंपनीचे अधिकारी करत आहेत, हा सर्व प्रकार तातडीने थांबवावा अशी आग्रही मागणी सुभाष घोरपडे यांनी केली. 

मागणीची तिव्रता पाहुन व आक्रमक आंदोलकांचा पावित्रा पाहत लगेचच विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता निलेश मोरे यांनी कर्मचार्यांना संपर्क करुन वीजबीलाच्या वसुलीसाठी कुठल्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित करु नये असे आदेश दिले. व इतर मागण्या संदर्भात लेखी आश्वासन दिले. 

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे,भाजयुमोचे अमोल गर्जे, मनसेचे शहराध्यक्ष सुभाष घोरपडे, सुनिल बेळगे, संदिप बेळगे, करोडीचे सरपंच महेश अंगारखे, लक्ष्मण डांगे,शहर सचिव संदिप काकडे, अादिंसह मनसेचे, भाजयुमोचे, व रिपाइंचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप, पोलीस कॉन्स्टेबल फुंदे, बुधवंत, रसाळ, नवगिरे, बडे, डोमाळे,आदी पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या