Ticker

6/Breaking/ticker-posts

पुन्हा एकदा नोटबंदी? काय म्हणाले आरबीआयचे महाव्यवस्थापक ...


 नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही वर्तविली आहे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचे विचारधीन असल्याचेही त्यांनी सांगितले. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बी. महेश बोलत होते. आरबीआयकडून बँकांना नोटा परत घेण्याची मोहीम आखण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे बँकेत जमा झालेल्या १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाही यासाठी बँकांनी देखील तयारी केली आहे.

यावेळी बी. महेश यांनी १० रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसेच उद्योजकांकडून स्वीकारले गेले नसल्यावरुन नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणे ही बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठं ओझं झालं आहे”.यावेळी त्यांनी नाण्याच्या वैधतेसंबंधी अफवा पसरत असून लोकांना याबद्दल जागरुक करण्याची गरज बोलून दाखवली. लोकांनी १० रुपयांचं नाणं जास्तीत जास्त वापरावं यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले २०१९ मध्ये आरबीआयने १०० रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. बी महेश यांनी १०० च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या