Ticker

6/Breaking/ticker-posts

धनंजय मुंडे यांच्या झालेल्या बदनामीचा वाली कोण?

 

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गांसंदर्भातील बैठकीला उपस्थिती लावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. पवारांच्या या वक्तव्यात विशेष अधोरेखित मुद्दा ठरला तो म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांचा.

सदर प्रकरणी धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुळातच आरोप करणाऱ्या महिलेनंच तक्रार मागे घेतल्यामुळं आता मुंडेंवर निशाणा साधणारे पेचात पडले आहेत. त्याचबाबत प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले, 'एखादी राजकीय व्यक्ती काम करते, या क्षेत्रात त्यांना प्रचंड काम करावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात, पण असं जेवढं घडतं तेव्हा त्यांना एक क्षणात पायउतार व्हावं लागतं, याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे'. बहुजन समाजतून पुढे आलेला एक सहकारी, तो बदनाम होतो ही बाब त्यांनी अतिशय नाराजीच्या सूरात सर्वांसमक्ष मांडत काही प्रश्न विरोधकांना आणि मुंडेंवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाच उद्देशून विचारले.

राजकीय क्षेत्रात कारकिर्द असणाऱ्या व्यक्तीबाबत जेव्हा असा एखादा गंभीर आरोप करण्यात येतो, तेव्हा त्याव्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो, विरोधकांत्या हाती हा मुद्दाच मिळतो, महिला संघटना त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यास सुरुवाता करतात, त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होते. हे सर्व पाहता आता धनंजय मुंडेंबाबत कोणतीही माहिती न घेता ज्यांनी वक्तव्य केलं त्याला जबाबदार कोण, त्याला कोण उत्तर देणार, एक तरुण नेतृत्त्व म्हणून धनंजय मुंडे यांनी संधीचं सोनं केलं, त्यांनी कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव केला, ते त्यांचं काम करतच होते पण, मागील पाच ते सात दिवस त्यांचं कुटुंब आणि ते मानसिकदृष्ट्या खचले होते याला कोणी वाली आहे का? असे कैक प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या