Ticker

6/Breaking/ticker-posts

विकासातील शुक्राचार्यांना बाजूला करा - पवार


 अकोले-अकोल्यातला अगस्ती सहकारी साखर कारखाना 35 कोटीत उभा राहिला मात्र आज अगस्ती कर्जाच्या बोजाखाली असल्याचं मला कळालं. आहे कारखान्यावर 200 कोटी पेक्षा अधिक कर्जाचा बोजा झाला आहे . या‌ कर्जाला जे जबाबदार आहे त्या विकासातील शुक्राचार्यांना बाजूला करा, कारखाना चालवण्यासाठी‌ सर्व ती मदत करू , असे सांगत शरद पवार यांनी त्यांचे जुने सहकारी व अगस्तीचे अध्यक्ष मधुकर पिचड यांच्यावर टीका केली.

 जिल्ह्यातील विकासाचे राजकारण ,पाणीप्रश्न ,कारखानदारी ,अशा विविध विषयांना हात घालत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या बालपणातील काही आठवणींना आज उजाळा दिला निमित्त होते त्यांच्या अकोले तालुका दौऱ्याचे

अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येथे माजी आमदार कै यशवंतराव भांगरे यांचा 39 व्या पुण्यतिथी सोहळा व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांचा हस्ते झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

लोणी( प्रवरानगर)येथे रयत सस्थेच्या शाळेत नववीत शिक्षण घेत असताना मी सायकलवर लोणी ते भंडारदरा असा प्रवास करून रंधा धबधबा पाहण्याचा आनंद घेतला होता तेव्हापासून अकोल्याचे मला आकर्षण राहिले याची आठवण करून देत शरद पवार म्हणाले की माजी आमदार यशवंतराव भांगरे हे माझे जुने सहकारी माझ्या अगोदर 1962 ला विधानसभेत होते तर मी 1967 ला विधानसभेत गेलो माझ्या अगोदर 5 वर्ष ते विधानसभेत होते माझ्यापेक्षा राजकारणात ते जेष्ठ होते त्यांच्या कडे विकासाची दृष्टी होतीअसे गौरवोद्गार काढत ते म्हणाले त्यानी अगस्ती कारखाना ,दूध संघ, शिक्षण संस्था या सारख्या संस्था सुरू करण्यास त्यावेळी पुढाकार घेतला सामान्य जनतेच्या विकासाची बाजू घेणारे यशवंतराव भांगरे यांच्या सोबत त्यावेळीं एकत्र काम करण्याची संधीं मिळाली त्यांनी अकोल्यातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य आज मला लाभले
अंतुलेंच्या काळात १९८० ला ५६ पैकी ५० आमदार मला सोडून गेले होते. परंतु पुढच्या निवडणुकीत सोडून गेलेले ४८ आमदार पराभूत झाले. ही किमया जनता घडवते. याची आठवण त्यांनी करून देत
मधल्या काळात काही लोक मला सोडून गेले त्या सर्वांना जनतेने नाकारले अकोल्यात ही तेच झाले विधानसभा निवडणुकी च्या वेळी अकोल्यात आलो त्यावेळी पहिल्या सभेत मला जनतेच्या मनातील बदलाची भावना समजली होती तालुक्यातील जनतेने पक्ष सोडून जाणाऱ्यांना दूर करत डॉ किरण लहामटे यांना आमदार केले असा निशाणा त्यानी  मधुकर पिचड यांच्यावर साधला. जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही

अकोलेतील जनतेने दाखवून दिले आहे. भांगरे कुटुंबाने सामंजस्याची भूमिका घेतल्याने परिवर्तन झाले. असेच सामंजस्य टिकून ठेवा. विकास कामांसाठी बांधिलकी ठेवून काम करा. तालुक्याचे लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन काम करा पक्षाच्या थोड्याशा चुकाही झाली तरी त्याचा त्रास।होतो असे सांगत तालुक्यातील विकास कामासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही पवार यांनी दिली

अकोले तालुक्याच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही पर्यटन विकास करण्यासाठी आमदार डॉ किरण लहामटे ,अशोक भांगरे यांच्या पाठीशी उभे राहून अकोले तालुक्याची पर्यटनासाठी एक वेगळी ओळख निर्माण होईल असे काम करू असे ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितले

यावेळी आमदार डॉ किरण लहामटे , जिल्हा परिषदेचे माजीं अध्यक्ष अशोकराव भांगरे मधुकर नवले , दशरथ सावंत युवानेते अमित भांगरे विनोद हांडे यांनी मनोगत व्यक्त केले तर सरपंच दिलीप भांगरे यांनी शेवटी आभार मानले
याप्रसंगी आदिवासी विकास राज्य मंत्री ना प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले आमदार माणिकराव कोकाटे, संदीप वरपे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सुनीताताई भांगरे, भानुदास तिकांडे ,सुरेश गडाख ,मारुती मेगाळ, आदी सह व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या