Ticker

6/Breaking/ticker-posts

नवीन पाईपलाईनचे काम त्वरीत पूर्ण करा - खा. सुजय विखे पा.

 


अहमदनगर:- केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत नगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी पंपिंग हाऊस आणि  बी पी टी, धामोरी फाटा , वांबोरी फाटा, नांदगाव,शिंगवे  देहरे,यामार्गे जाणाऱ्या  पाईपलाईनची पाहणी खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केली.अमृत योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 अमृत योजनेचे काम पूर्ण व्हावे यासाठी खा.विखे पाटील यांनी धडाडीने पाठपुरावा सुरू केला आहे.यासाठी विभागाचे अधिकारी पदाधिकारी यांना सोबत घेवून त्यांनी कामातील समस्या तातडीने सोडण्याचे निर्देश दिले. अमृत योजना अंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम अहमदनगर महानगरपालिका सुरुवात केली या कामाबाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांची संवाद साधला, खासदार डॉ विखे पाटील स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व लवकरात लवकर  सोडवणूक करण्याची ग्वाही दिली.

खा. विखे म्हणाले की, अमृत योजने अंतर्गत नवीन पाइपलाइन टाकायचे कामात भूसंपादन होणार नसून जमिनीखालून पाईपलाईन टाकण्यात येणार आहे ,तरी देखील आपण शासन नियमाप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, राहुरी कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे,स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर,संजय ढोणे, भाजपचे नगर तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे,उदय सिंह पाटील,प्रांताधिकारी  नगर चे श्री श्रीनिवास अर्जुन,श्रीरामपूर चे श्री अनिल पवार साहेब ,उपायुक्त श्री डॉ प्रदीप पटारे, तहसीलदार उमेश पाटील,पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री रोहिदास सातपुते,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण श्री अजय मुळे,बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता बांगर,महापालिका अभियंता राहुल गीते,गणेश गाडुलकर,तालुका कृषी अधिकारी पी बी नवले,वनपरिक्षेत्र अधिकारी श्री थेटे ,श्री पोकळे,पोलीस उपनिरीक्षक ,अधिकारी व शेतकरी ,ग्रामस्थ उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या