Ticker

6/Breaking/ticker-posts

आ. रोहित पवारांचा पुढाकार ; सिद्धटेकसाठी 'चाळीस 'कोटींचा सुधारित आराखडा

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

सिध्दटेक (ता. कर्जत ):- येथील अष्टविनायकापैकी एक प्रसिध्द असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिर व परिसर विकास कामांसाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन नवीन चाळीस कोटी रुपयांचा प्रस्तावीत सुधारित आराखडा तयार केला आहे . त्याच्या प्राथमिक मंजुरीसाठी व काही सुधारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सबंधीत सर्व आधिकाऱ्यांची बैठक आपल्या कार्यालयामध्ये घेतली. यामध्ये सर्व बाबीवर चर्चा करून काही बदल , सुधारणा करून मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे .

     सिद्धटेक विकास आराखडया नुसार सन २००६ पासून विकास कामे सुरू आहेत . यामध्ये भक्तनिवास , बहुउदेशीय सभागृह , प्रसादालय , नळ पाणी पुरवठा योजना , जलशुध्दीकरण केंद्र , उदयान विकास , प्रदक्षिणा मार्ग , व्हीआयपी कक्ष , नदीघाट बांधने , कार पार्किंग , दर्शन मंडप , स्वच्छता गृह , क्लॉक रूम , माहिती फलक इत्यादी कामे सन २०१९ पर्यंत चालु होती . या कामांसाठी अंदाजे वीस कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला होता . त्यामधील काही रक्कम अजूनही अखर्चित आहे .

    नवीन आराखडया मध्ये पायाभुत सुविधा , मुलभुत सुविधा व सौंदर्य करण या बांबी वर भर देण्यात आला आहे .यानुसार राशीन रोडलगत वाहन पार्किंग ,री०हर पार्किंग , पुजा साहित्य शॉपी , नविन नदी घाट , प्रसादालय , समाजगृह , अत्याधुनिक शौचालय , भक्तनिवास , मेडीटेशन हॉल , सुधारित प्रदक्षिणा मार्ग , गार्डन , टेंपल अलाइमेंट , वॉकिंग पार्क इत्यादी कामांचा समावेश आहे. 

    या सर्व घटकांची माहिती घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आराखडयाचे टप्पे पाडून जी कामे जुन्या व न०या आराखडयात आहेत ती पुन्हा न करता आहे त्यामध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची सुचना केली . तसेच सर्व कामांसाठी लागणाऱ्या जागेची कायदेशीर मंजुरी घेण्याचे सुचवले. तसेच इमारती पुर्ण झाल्यानंतर त्यांची देखभाल - दुरूस्ती कोणी करायची ?यावरही पर्याय काढण्याच्या सुचना आधिकाऱ्यांना केल्या . या आराखडयासाठी ग्रामस्थ , लोकप्रतिनिधी , शासकिय आधिकारी यांचीही मते विचारात घेण्याचे सुचविले आहे.

    सिद्धटेक च्या विकास कामांसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या काळातही भरीव निधी आला होता .परंतु ग्रामस्थ , देवस्थान व प्रशासनाच्या समन्वयाअभावी तो खर्च करता आला नाही व त्यामुळे काही कामे पूर्ण करता आली नाहीत . आता आ. रोहित पवार यांचाही नवीन विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी कस लागणार आहे. या आराखडयाच्या बैठकीसाठी जिल्हा नियोजन आधिकारी निलेश भदाणे, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम अहमदनगरचे संजय पवार , प्रांताधिकारी अर्चना नष्टे , व इतर अधिकारी उपास्थित होते .

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या