Ticker

6/Breaking/ticker-posts

पवार साहेबांचा नगर दौरा अखेर फायनल .. ! त्या हॉस्पिटलचे उद्धाटन होणार -... !


 अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  हे २४ जानेवारीला नगर दौ-यावर येत आहेत . तसा त्यांचा शासकीय दौरा काही मिर्मिटापूर्वी जाहिर झाला असून या दौऱ्यात ते एका खाजगी हॉस्पिटलचे देखिल लोकार्पण करणार  आहेत. 

            करोना काळातील जे खासगी हॉस्पिटउपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी त्यासाठी मनसेने निवेदन दिलीआंदोलन केली. तसेच उपजिल्हाधिकारी यांच्या समितीने करोना काळातील संपूर्ण बिलांची तपासणी करून आतापर्यंत १४ ते १५ खासगी हाॅस्पिटलकडून जवळपास एक करोड रुपये वसुलीचे आदेश महापालिकला दिले आहेत. हे पैसे संबधित रुग्णांच्या बँक खात्यावर जमा करावेअसे आदेश महापालिका आयुक्तांनीआरोग्य अधिकारी यांनी या सर्व हॉस्पिटलला दिले. परंतु या सर्व हॉस्पिटलने या आदेशाला केराची टोपली दाखवलीअसा आरोपही मनसेने केला होता . तसेच अन्य हितसंबंधितांनी या हॉस्पिटलच्या उद्धाटनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते . परंतु चाणक्या पुढे है . सर्व जण फिके पडले असून खा.पवार यांच्या हस्ते अखेर त्या हॉस्पिटलचा शुभारंभ होणारच आहे . अनेकांनी देव पाण्यात बुडून ठेवले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही .

            आजपर्यंत महापालिकेने सुद्धा वाढीव बिलांची रक्कम परत न दिल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई या संबधित हॉस्पिटलवर केली नाही. करोना आजारात गोरगरीब जनतेला सरकारी रुग्णालयात बेड मिळत नव्हतेम्हणून त्यांना नाईलाजस्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले व त्यांच्याकडून लाखो रुपयांचे बिले या खासगी हाॅस्पिटलवाल्यांनी वसूल केली असा आरोपही त्यांनी केला आहे. सरकारने दिलेल्या कुठल्याही नियमाप्रमाणे या हॉस्पिटलवाल्यांनी बिले दिली नसल्यामुळे गोरगरीब जनतेची लूटमार झाली. त्यामुळे आम्ही मनसेच्या वतीने वारंवार मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,पालकमंत्री यांना निवेदन पाठविले. परंतु कुणीही या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. रविवारी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार नगरला येत आहेत. या दौऱ्यावेळी खासगी हाॅस्पिटलचा वाढीव बिलांचा प्रश्न मांडण्यासाठी  पवार येणार आहेत त्या मार्गावर ''पवार साहेब गोरगरीब जनतेची करोना आजारवरील वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून द्या'' असे बॅनर लावणार  असल्याचे शहर मनसेने म्हटले होते . 
अर्थात नगरमध्ये आणि संपूर्ण राज्याचाच नेव्हे तर देशभरातला हा विषय आहे . याची चांगली जाण पवार साहेबांना आहे . त्यामुळे स्थानिक पातळीवरची कोल्हेकुई त्यांना नेवीन नाही . शिवाय त्यांच्याबरोबर पालकमंत्री ही असल्याने  कोणत्याही अनौपचारिक र्विषयांना फारसं महत्व राहिलं नाही . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या