Ticker

6/Breaking/ticker-posts

चला .. रेखाटूया निसर्ग .. व नगरच्या ऐतिहासिक वास्तू



ट्रेकयात्री व अशोका आर्ट फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

नगर : -ट्रेकयात्री आणि अशोका आर्ट फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चला  रेखाटूया निसर्ग .. आणि नगरच्या ऐतिहासिक वास्तू हा उपक्रम रविवारी अतिशय आनंदात साजरा करण्यात आला .

यावेळी कलाशिक्षक व प्रसिद्ध चित्रकारअशोक डोळसे यांनी रेखाटन करण्याच्या विविध पद्धती व प्रत्यक्ष रेखाटन प्रात्यक्षिक  सर्वांना करून दाखविले. सर्व लहान मोठ्यांनी या उपक्रमात आनंदाने सहभाग नोंदविला . आपल्याला दिसणारा , जाणवणारा निसर्ग, वृक्ष, ऐतिहासिक वास्तू पेन्सिल - पेन च्या माध्यमातून सर्वांनी कागदावर सुंदर रेखाटल्या .सहसी ट्रेक सोबत हा कला निर्मितीचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरून ओसंंडून  वाहत होता . आपल्या आई - वडिलांनी  काढलेली चित्रे लहान मुले अतिशय एन्जॉय करत होती . अनेक वर्षांनी चित्र काढण्याचा अनोखा आनंद मिळाल्याचे समाधान सर्वांच्या चेहर्‍यावर दिसत होते .

 ट्रेक यात्री च्या वतीने रवींद्र चोभे, तेजस जीपकाटे यांनी माहिती सांगितली . लिटल फ्लॉवर प्रि स्कूल मधिल छोट्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात विविध चित्रे काढून धम्माल केली . सौ. हर्षदा डोळसे यांनी आर्ट फौंडेशन आणि कला उपक्रमांची माहीती सांगितली . मोठ्या संख्येने कलारसिक नगरकर या उपक्रमात सहभागी झाले . सोशल मीडियाचं मायाजाल आणि रेडिमेडच्या या युगात विधार्थी व मुलांमधिल सृजनशिलतेला चालना देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असाच आहे . अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली .









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या