Ticker

6/Breaking/ticker-posts

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध


 नेवासा : माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नेतृत्वाखालील  लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या  सर्व   21 जागाची निवडणूक  बिनविरोध झाली आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना  संचालक मंडळ  21 जागेसाठी पंचवार्षिक निवडणूकी साठी 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.दि.6 जानेवारी रोजी झालेल्या  छाननी मध्ये 282 पैकी 135 अर्ज पात्र तर 147 अर्ज अपात्र ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या (गुरुवार दि.21) दिवशी 114 उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संचालक मंडळाच्या सर्व  21  जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

*बिनविरोध निवडून आलेले संचालक असे...*

*शेवगाव गट 2 जागा बिनविरोध*

नरवडे सुधाकर नारायणराव व भोसले पंडीत रामभाऊ

*शहरटाळकी गट 2 जागा बिनविरोध*

घुले नरेंद्र मारुतराव  व घुले चंद्रशेखर मारुतराव 

*कुकाणा गट 2 जागा बिनविरोध*

अभंग पांडुरंग गमाजी व म्हस्के नारायण कारभारी 

*नेवासा गट 3 जागा बिनविरोध*

लंघे विठ्ठलराव वकीलराव,शिंदे काकासाहेब आबासाहेब, गंडाळ गोरक्ष दगडु

*वडाळा गट 3 जागा बिनविरोध*

कांगुणे भाऊसाहेब सोन्याबापू, कदम जनार्धन रामभाऊ,कोलते शिवाजी राजधर 

*ढोरजळगाव गट 3 जागा बिनविरोध*

म्हस्के मच्छिद्र सुर्यभान,भुसारी बबनराव मुरलीधर,लव्हाळे सखाराम दिगंबर

*अनु.जाती/जमाती मतदार संघ बिनविरोध*

 नन्नवरे दिपक तुळशीराम

*महिला प्रतिनिधी मतदार संघ 2 जागा बिनविरोध* 

जगदाळे ताराबाई हनुमान व नवले रत्नमाला काशिनाथ

*भटके-विमुक्त मतदार संघ बिनविरोध*

मिसाळ लताबाई अशोक

*नामाप्रवर्ग मतदार संघ बिनविरोध*

पावसे शंकर लक्ष्मण 

*उत्पादक सहकारी संस्था,बिगर उत्पादक-पणन संस्था मतदार संघ जागा बिनविरोध*

देशमुख देसाई भाऊसाहेब

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या