Ticker

6/Breaking/ticker-posts

दुःखद बातमी’ नगरचे प्रथम माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचं निधन’


 अहमदनगर- शहराचे प्रथम माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, बहिणी, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

स्व. खांडरे हे लोकनेते दिवंगत गोपिनाथराव मुंडे, व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे निकटवर्तीय  होते. स्व. मुंडे यांनीच खांडरे यांना उपमहापौरपदाची संधी दिली . त्यांनीही शेवटपर्यंत मुंडे परिवाराशी निष्ठा कायम ठेवली मित्रपरिवारात खांडरे माऊली या टोपण नावाने परिचीत होते. अहमदनगरचे विधिज्ञ अॅड. बाळासाहेब खांडरे यांचे ते बंधू होत.

त्यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता अ.नगर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार होणार आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या