Ticker

6/Breaking/ticker-posts

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचं 12 नेते प्रचारक

 

                                        


पंकजा मुंडे, आशिष शेलाररावसाहेब दानवे

प्रीतम मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख

मुंबई : मुंबईत मंगळवारी भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी ग्रामपंचायत, महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. यात 12 नेते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राज्यभर प्रचार करणार असल्याचं निश्चित करण्यात आलं. यात काही नेत्यांकडे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जिल्हानिहाय जबाबदारी देण्यात येणार आहे. यात पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे.

सोबतच विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय राम मंदिर निधी, कार्यलय निर्माण या मुद्द्यांवरही चर्चा झाली. बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैया, संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे उपस्थित आहेत

आगामी काही दिवसात नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडण्यापासून ते निवडून येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षातील उमेदवारांना भाजपत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यावरही चर्चा झाली. बहुतांश महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण काही ठिकाणी शक्य असेल तर स्थानिक आघाडी करुन भाजप निवडणूक लढणार आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या