Ticker

6/Breaking/ticker-posts

ग्रामपंचायत निवडणुक-जातपडताळणी कार्यालय रात्री पर्यंत सुरु

 

     ग्रामपंचायत निवडणुक रणधुमाळी                                                          

                                                                 

 नगर -ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ऑफलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री पर्यंत कार्यालय सुरु होते. बुधवारी रात्री पर्यंत सहा हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याची माहिती जात पडताळणी कार्यालयाचे महेश गटकळ यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जात पडताळणी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करणा-यांची संख्या वाढल्याने सर्व्हर डाऊन होत होता. त्यामुळे राज्य सरकारने मंगळवार पासून ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याचे आदेश दिले. मंगळवारी दिवसभर मोठी गर्दी होती. कार्यालयात जागा पुरत नसल्याने बेसमेंटमध्ये स्वतंत्र टेबल मांडून अर्ज स्विकारण्यात येत होते. रात्री बारा पर्यंत जात पडताळणी कार्यालय सुरु होते. बुधवारीही सकाळीच कार्यालय सुरु करण्यात आले होते. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने जात पडताळणी कार्यालयाला जत्रेचे स्वरुप आले होते. बंगाल चौकी परिसरात दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती. गर्दी नियंत्रण करण्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांची मोठी धावपळ उडत होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या