सोमराज बडे
चिंचपुर पां ( लोकनेता न्यूज):
नगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने भक्तगण असणारे वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी (ता.१५) रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात येt आहे.
यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस ,तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, आष्टी चे आमदार बाळासाहेब आजबे,माजी मंत्री आ.सुरेश धस,माजी आमदार भीमराव धोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
त्यानिमित्ताने वामनभाऊच्या समाधीवर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिरावर विद्दुत रोषणाई करण्यात आली आहे. पुण्यतिथीनिमित्त गडावर कालपासूनच मोठ्या संख्येने दिंड्या हजर झालेले आहेत हजारो वारकरी या दिंड्यांमधून सायंकाळच्या जागर कार्यक्रमास उपस्थित झालेले आहेत महंत ह भ प विठ्ठल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे गडावर व्हीआयपी साठी तीन हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. परंपरेप्रमाणे वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री. क्षेत्र गहिनीनाथगड ता.पाटोदा येथील पारंपरिक महापूजा सकाळी होणार असून त्यानंतर महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल.त्यानंतर समाधीवर सकाळी ठीक अकरा पंचेचाळीस वाजता पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावेळी लाखोंचा भक्त परिवार राज्यभरातून उपस्थित रहाणार आहे.
दरम्यान सोहळ्याला येणारे व्हीआयपी राजकीय मंडळी आणि मोठ्या संख्येने भाविकांची संख्या लक्षात घेता नियोजन करण्यात आले आहे कालपासूनच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या ठिकाणी पुण्यतिथी सोहळ्यास उपस्तीत रहाणार असल्याने गहिनीनाथ गडावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
0 टिप्पण्या