लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
गुंडेगव : दि. १५ सप्टे २०२२
नगर तालुक्यातील गुंडेगावाला तीन बाजुंनी डोंगर रांगानी वेढा दिला आहे . सुमारे साडे आठशे हेक्टर वनक्षेत्र गावाला लाभले आहे . या परिसरात झालेल्या पावसामुळे डोंगररांगानी हिरवा शालू पांघरला असून डोंगर माथ्यावरील नैसर्गिक धबधबे फेसाळत कोसळू लागले आहेत. वनक्षेत्रात स्वछंद बागडणारे विविधरंगी पक्षी , हरणांचे कळप अन् मोरांचे थवे मानवी मनाला भुरळ घालत आहेत . कशाला डोंगर , झाडी अन् गुहाहाटी ! आपले निसर्ग सौंदर्याने नटलेले गुंडेगाव पर्यटकांना खुणावते आहे .
मागील काही वर्षापुर्वी दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गुंडेगाव ने मागील पाच वर्षात समतल चर व ओढे रुंदी-खोलीकरणाची कामे वन विभाग , कृषी विभाग यांच्यामार्फत केली . सुमारे साडे आठशे हेक्टर वनक्षेत्रामध्ये पावसाचे वाहून जाणारे पाणी डोंगर व वनक्षेत्र परिसरात जिरविण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना मुळे गुंडेगावचे रुपडे पालटले आहे . समाधानकारक पाऊस झाला नसला तरी झालेल्या पावसाचे पाणी शेतशिवारातच जिरल्याने गावाची पाणीपातळी उंचावली असून गुंडेगाव हिरवेगार अन् पाणीदार झाले आहे. डोंगर दऱ्यातून वाहणारे पाणी नालाबांध व तलावात अडविले असल्याने सर्वत्र दिसणारे पाणी , हिरवीगार डोंगररांगामुळे गुंडेगावात 'कोकण ' चे सौंदर्य अवतरल्याचा भास निसर्गप्रेमींना होत आहे .
पावसाने डोंगर परिसरातील लहान मोठे धबधबे प्रवाहीत झाले आहेत . बहरलेल्या वृक्षांनी सजलेल्या डोंगररांगा , हिरवाशालु पांघरलेले निसर्ग सौंदर्य , नागमोडी वळणे घेत जाणारे डोंगर परिसरातील रस्ते , कडे कपारीतून फेसाळत वाहणारे धबधबे , अंगाला झोंबणारा गार वारा , मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी असा विलोभनीय निसर्गाचा मुक्त अविष्कार पाहण्यासाठी व निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी स्थानिकांसह पर्यटक फेरफटका मारताना दिसत आहेत .
समाजसेवक भापकर गुरूजी यांचेमुळे गावाला नवी ओळख
गाव हे तस एका कोपऱ्यात अडगळ आणि अनोळखी परंतु ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकार गुरुजींनी पदरमोड करून रस्ता तयार केला. समाजासाठी झटले. तेथून खऱ्या अर्थाने गुंडेगाव ओळखले जाऊ लागले. युवकांना या कामातून प्रेरणा मिळाली. नव नवे बदल होत गेले. म्हणूनच भा गुरुजींचं योगदान कोणालाही विसरता येणार नाही.
0 टिप्पण्या