Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डीत तालुक्यातील शिवसैनिकांची आज बैठक ; सर्वानी उपस्थीत राहण्याचे आवाहनलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी : - शिवसेनेचे नुतन नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनिल शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थीत आन सोमवार दिनांक 29/8/ 2022 रोजी  सायंकाळी ठिक  5 वाजता पाथर्डी येथे बैठ्क आयोजीत करण्यात आली असून सर्व शिवसैनिकानी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख  भगवानराव द्र्राडे व शहर प्रमुख सागर राठोड यानी केले आहे.


प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात त्यानी म्हट्ले आहे की,  माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यानी नुक्तेच राज्यभरातील शिवसेना निष्ठावंताना मोठी संधी उप्लब्ध करुन दिली आहे. अनेस पदाधिकार्यांवर नव नविन जबाबदार्या वाटुन दिल्या आहेत. या पार्श्वभुमिवर ही अत्यंत महत्वाची बैठक बोलाविण्यात आलेली आहे.


बैठकीस   नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनिल शिंदे, विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे,  शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी मार्गदर्शन करणार आहेत, तरी  पाथर्डी  शहर व  तालुक्यातील ग्रामीण भागातील  सर्व शिवसेना , युवासेना , महिला आघाडी पदाधिकारी,शाखा प्रमुख, शाखा संघटक, बूथ प्रमुख यांनी आज  सोमवार दिनांक 29/8/ 2022 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता. भगवान दराडे तालुकाप्रमुख संपर्क कार्यालय, पाथर्डी जुने बस स्थानकाजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना ,युवा सेना , महिला आघाडी पाथर्डी शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

            

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या