Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेनेच्या इशाऱ्यानंतरही नारायण राणे आज ठाकरे स्मारकाचे दर्शन घेणार?

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रा सुरू झाल्या असून केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज १९ ऑगस्टला मुंबईतून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान राणे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडर स्मारक आणि शिवाजी पार्कातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र, शिवसेनेने राणे यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेटीला कडाडून विरोध दर्शवला आहे. अशात राणे ठरल्याप्रमाणे स्मारकाला भेट देणार का की आपल्या भेटीत बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 शिवसेनेने इशारा दिला असला तरी राणे यांनी आपल्या यात्रेत कोणताही बदल केलेला नाही. आज गुरुवारी सकाळी १० वाजता राणे विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या यात्रेची सुरुवात करणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राणे यांच्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यानंतर राणे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडर स्मारक आणि शिवाजी पार्कातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन करणार आहेत.

नी यात्रेतून आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ वगळला

आपल्या वेळापत्रकानुसार राणे आपली यात्रा सुरू करणार असले तरी आपल्या यात्रेतून ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदार संघ वगळणार असल्याचे वृत्त आहे. वरळीत राणे यांची सभा देखील आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

बाळासाहेब ठाकरे संपूर्ण देशाचे- प्रवीण दरेकर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ येऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केली आहे. याला भारतीय जनता पक्षाने मात्र विरोध दर्शवला आहे. नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेमुळे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी नक्कीच ताकद मिळेल. या यात्रेमुळे विकास व विश्वासाचं वातावरण निर्माण होईल. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे त्यांचा आशिर्वाद घेण्याचा सर्वांना अधिकार आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या